लग्नाचा अनुभव घेऊन बघितला पाहिजे....

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. पण, सध्या जमाना ऑनलाईनचा आहे. कोणतीही गोष्ट करायची म्हटली की प्रथम ऑनलाइनकडे पाहिले जाते. मग, विवाह जमविण्यासाठी सुद्धा ऑनलाइनकडे पाहिजेच ना? म्हणून तर www.hindustanmatrimony.in हे विश्वासहार्य संकेतस्थळाने आपल्या सेवेसाठी पुढे आले आहे....

हिंदू धर्मशास्त्रानुसार देवा ब्राह्मणांच्या साक्षीने म्हणजेच वैदिक पद्धतीने, परंपरेने विवाहाचे सोहळे होतात. वधू आणि वराकडच्या वर्‍हाडी मंडळींच्या उपस्थितीत, मंगलाक्षतांनी विवाहावर शिक्कामोर्तब होतो. सप्तपदी होते. गेल्या काही वर्षात विवाहाच्या सोहळ्यामध्ये बदल होत असताना दिसून येतात. विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने खर्च करताना दिसतो. पण, अलीकडे काही दिवसांमध्ये प्री-वेडिंग पाहायला मिळते. खरंच, हौसेला मोल नाही... मग, विवाहाप्रमाणेच यावर सुद्धा मोठा खर्च केला जातो. प्री-वेडिंगचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केले जातात. मग, आला की ऑनलाइनचा जमाना...

भारतीय कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. म्हणूनच आजच्या वेगवान जगाशी जुळवून घेताना आजची तरुण पिढी लग्नव्यवस्थेबद्दल नेमका कसा विचार करते? हे पाहणे गरजेचे आहे. हल्ली, जीवनशैली बदलत आहे. प्रत्येकाला वेळ कमी पडू लागला आहे, अशा वेळी आपल्याला योग्य जोडीदार शोधणे अथवा योग जुळून येणे महत्त्वाचे... योग जुळून येण्यासाठी कुठेतरी एक दुवा जोडण्याची आवश्यकता असते. मग, हा दुवा कसा जोडला जाणार तर.. ऑनलाइन माध्यम हवेच ना...

लग्नाचा अनुभव प्रत्येकाने घेऊन बघितला पाहिजे. लग्न यशस्वी झालंच पाहिजे, यावर कोणाचेही दुमत नाही. ‘लग्न काही ऑफिसचं काम नाही, अनुभव घेऊन बघायला, ते यशस्वीच झालं पाहिजे. तरुणाईच्या मते लग्न म्हणजे नेमकं काय? तर ‘लग्न म्हणजे प्रत्येकाला देवाने दिलेलं अमूल्य बक्षीस.’ ‘लग्न म्हणजे सुंदर स्वप्न’ असे भाबडे आणि काव्यात्म विचार काहींनी मांडले. ‘लग्न म्हणजे तडजोड’, ‘लग्न म्हणजे सर्वसामान्य बाब’, असे बरेचसे व्यावहारिक, बरेचसे विचारही मांडले गेले. ‘लग्न म्हणजे व्यवस्था. केवळ वंश चालवायला म्हणून नव्हे, तर आयुष्यभरातली सुख-दु:खं वाटून घेणारा साथीदार हवा म्हणून लग्न करावे,’ सहजीवनाविषयी बोलणारे मोजके अपवाद वगळता बाकी विषय लग्नसंस्थेच्या स्वप्नाळू कविकल्पनेत किंवा नकारात्मक व्यावहारिकतेमध्ये अडकलेले जाणवले. पण लग्न कशासाठी करायचंय याचं उत्तर आयुष्यभरासाठी जोडीदार हवा म्हणून... अन् ते 100 टक्के खरं आहे, हे आजच्या परिस्थितीमधून पाहायाला मिळते.

एकंदरीत काय तर आनंदी आयुष्य जगायला हवे. योग्य जोडीदार निवडायला हवा अन् भारतीय संस्कृती, परंपरा घेऊन पुढे जायला हवे. आपण आपला योग्य जोडीदार निवडू तो www.hindustanmatrimony.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून...